तळजाई टेकडीवरील जंगलात पुन्हा आगीची झळ

तळजाई टेकडी वन विभागाचा एक एकरचा परिसर जळाला
तळजाई टेकडी वन विभागात लागलेली आग विझवतात अग्निशमन दलाचे  जवान व वन कर्मचारी
तळजाई टेकडी वन विभागात लागलेली आग विझवतात अग्निशमन दलाचे जवान व वन कर्मचारीsakal

सहकारनगर : तळजाई टेकडी वन विभागात बुधवारी दुपारी चार वाजता मोर पॉईंटच्या पाठीमागच्या बाजूला आग लागली असून एक एकरचा परिसर जळाला आहे.परिसरातील दहा ते पंधरा झाडांना आगीची झळ पोहोचली आहे. झाडांचे नुकसान झाले आहे मात्र वेळीच अग्निशामक दल व वन विभागाच्या कर्मचारीनी आग आटोक्यात आणून पुढील दुर्घटना टळली आहे. याठिकाणी वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.मागील आठवड्यात अशीच आग लागली होती.याठिकाणी आगीच्या घटना पाहता आग लागली जाते का ? लावली जाते? हे वन विभागाने पाहणे गरजेचे आहे आणि आगीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

या ठिकाणी अशा वारंवार घटना घडू नये यासाठी वन विभागाने सुरक्षारक्षक वाढवून येथील जंगल सुरक्षित राखण्याची गरज आहे आणि येथील आग लावणाऱ्या काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com