फॉक्स न्यूज अहवाल

फॉक्स न्यूज अहवाल
Published on: 

फ्रान्सच्या दंगलींचा भारतातील आंदोलनांशी संबंध

‘फॉक्स न्यूज’च्या अहवालातील दावा : नऊ देशातील १०१ संघटना सक्रिय

नवी दिल्ली, ता. २३ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी भारतात झालेली निदर्शने आणि फ्रान्समध्ये सुरू असलेल्या दंगली यांचा परस्परसंबंध असल्याचा दावा ‘फॉक्स न्यूज डिजिटल इन्व्हेस्टिगेशन’ने केला आहे. यामागे नऊ देशांतील १०१ संघटना असल्याचेही या अहवलात म्हटले आहे.
‘फॉक्स न्यूज’च्या वरिष्ठ संपादक अस्रा नोमानी यांनी अहवाल केला असून, ‘ग्लोबल केओस आयएनसी ग्रोज टू १०१ ग्रुप’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात या संघटनांना ‘रेड-ग्रीन प्रोटेस्ट इकोसिस्टीम’ (इस्लामिक आणि कम्युनिस्ट गटांशी संबंधित) असे म्हटले असून, या प्रणालीमध्ये १०१ संघटनांचा समावेश करण्यात आला आहे. जगभर वाढत चाललेल्या असंतोषाच्या वातावरणात युरोपमधील आंदोलनांमध्ये समन्वय, आयोजन आणि विस्तार करण्याचे काम या संघटना करत आहेत. यामध्ये ‘इंडियन अलायन्स पॅरिस’ या फ्रान्समधील संघटनेचा उल्लेख असून, ती फ्रान्स आणि भारतीय आंदोलनांमधील संदेशांना जोडण्याचे काम करत आहे. मॅनहॅटनमधील ‘पीपल्स फोरम’सोबत भागीदारीत काम करत आहे.
या अहवालामध्ये नोमानी यांनी ‘प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीविरोधी संघटनेचाही उल्लेख केला आहे. या संघटनेने १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीपत्रकामध्ये फ्रान्स, स्पेन, भारत आणि अल्बानियातील सध्याच्या आंदोलनांचा उल्लेख केला होता. ज्या परिस्थितीमुळे ही आंदोलने निर्माण झाली, ती परिस्थिती बदलण्याची आवश्यक संघटित ताकद या बंडखोरांना मिळवता येईल का, असा प्रश्न यात विचारण्यात आला होता. तसेच, याच शक्तींना पाठिंबा देण्यासाठी आमची संघटना काम करत आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे.
‘ब्रेकथ्रू न्यूज, कोडपिंक, पार्टी फॉर सोशलिझम अँड लिबरेशन यांसारख्या कम्युनिस्टसमर्थक संघटनांकडून युरोपमधील आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. शांघायमध्ये राहात असलेले अमेरिकी वंशाचे तंत्रज्ञान उद्योजक नेव्हील रॉय सिंघम यांच्याकडून या आंदोलनांना पाठिंबा आणि आर्थिक रसद मिळत आहे,’ असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. कोडपिंकच्या सहसंस्थापक आणि सिंघम यांच्या पत्नी ज्युडी इव्हान्स यांनी ‘ब्रेक थ्रू न्यूज’ला मुलाखत दिली होती. ही मुलाखत १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘मला वाटते की लोकांनी फ्रान्स, स्पेन आणि भारताकडे पाहावे. आपण कुठे आहोत? आपण का बरं रस्त्यावर उतरत नाही?’’ तर, ‘पॅरिसस्थित भारतीय वंशाचे पत्रकार आणि ‘आयएपी’चे सचिव जॉय बॅनर्जी यांचा फ्रान्समधील कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असून, ते सीजीटी युनियनचे प्रतिनिधी आहेत,’ अशी पोस्ट एका ‘एक्स’ हँडलवर ‘डिसइन्फोलॅब’ने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com