

हिंगणे मळा : परिसरातील महिलांनी लोक आदालतीमध्ये काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्याकडे सुरक्षिततेची मागणी केली.
Sakal
हडपसर : येथील हिंगणेमळा परिसरातील कालव्याचा परिसर सध्या बेकार तरुण व तळीरामांचा अड्डा बनला आहे. भांडणे, आरडा-ओरडा, वादविवाद, दारूच्या बाटल्यांच्या काचा आणि घाणीचे साम्राज्य यामुळे येथील रहिवासी विशेषता महिलांना भीतीच्या छायेत वावरावे लागत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालल्याने परिसरातील महिलांनी पोलिसांना प्रत्यक्ष बोलावून आपले गाऱ्हाणे त्यांच्या समोर मांडले.