

POH26A00683
कोपरगाव ः मढी खुर्दचे भूमिपुत्र प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित करताना खासदार सुप्रिया सुळे. समवेत मान्यवर.
डॉ. नानासाहेब गायकवाड यांचा सन्मान
पोहेगाव, ता. ५ ः मढी खुर्द गावचे भूमिपुत्र, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांचा रयत शिक्षण संस्थेच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मिळालेला हा सन्मान मढी खुर्दसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा पुढे नेत डॉ. गायकवाड यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. प्राचार्य म्हणून त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. शैक्षणिक, प्रशासकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची विशेष दखल घेण्यात आली.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणारा ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव करणारा असून, रयत शिक्षण संस्थेच्या मूल्याधिष्ठित शैक्षणिक परंपरेत त्यांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे. या पुरस्कारामुळे शैक्षणिक आणि सामाजिक लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.