

तळेगाव स्टेशन, ता. १५ : शाळांतील काही शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या बेकायदेशीर खासगी शिकवणी वर्गांवर प्रतिबंध घालून कडक कारवाई करण्याची मागणी तळेगाव शहर युवक काँग्रेसने केली आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शालेय अंतर्गत २० गुणांचा अधिकार असलेल्या काही शिक्षकांकडून खासगी शिकवणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना गुरुवारी (ता. १५) निवेदन दिले. उपमुख्याधिकारी ममता राठोड यांना निवेदनाची प्रत देताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज, तालुका सरचिटणीस राजीव फलके, संपर्कप्रमुख राजू शिंदे, किरण मोकाशी, स्वप्निल निकाळजे आदी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.