बातमीचा भाग क्रमांक १ पेट्रोल पंपावर वाद, कंपनीच्या अधिकाऱ्याचा खून

बातमीचा भाग क्रमांक १ पेट्रोल पंपावर वाद, कंपनीच्या अधिकाऱ्याचा खून
Published on: 

‘इंडियन ऑइल’च्या
विक्री व्यवस्थापकाचा खून
-----------
हिंगोली जिल्ह्यातील घटना : पेट्रोलपंप ‘सील’ करण्यावरून वाद

वसमत (जि. हिंगोली) ता. ६ : तालुक्यातील चोंढी येथे पेट्रोल पंप सील करून ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइल अधिकाऱ्यांसह पेट्रोल पंपचालकाच्या कुटुंबीयांत वाद विकोपास गेल्यानंतर या कंपनीच्या विक्री विभाग व्यवस्थापकाचा खंजिराने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. महेश शेळके असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे.

कुरुंदा पोलिसांचे पथक संशयिताच्या शोधासाठी रवाना केले आहे. तालुक्यातील चोंढी शिवारात ‘इंडियन ऑइल’तर्फे साहेबराव पांडववीर यांना दोन वर्षांपूर्वी पेट्रोल पंप मंजूर करण्यात आला होता. तीन महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे पंप बंद होता. पंप दीर्घकाळ बंद असल्याने ‘इंडियन ऑइल’च्या नांदेड कार्यालयाकडून कारवाईचा भाग म्हणून मंगळवारी दुपारी सुमारे बाराच्या सुमारास कंपनीचे काही अधिकारी व कर्मचारी पेट्रोल पंप सील करण्यासाठी चोंढीत पोचले. त्यावेळी झालेला वाद वाढला अन् उमेश पांडववीरने कंपनीचे विक्री विभागाचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर अचानक खंजिराने हल्ला केला. शेळके यांच्या पोटावर, पाठीवर, तोंडावर सात वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर उमेश फरार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com