Pune : जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

जांभूळ वाडी दरी पुलावर मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दिवसांपासून रेती वाहतूक करणारा एक ट्रक (एम एच १७ बी डी ७७६७) बंद अवस्थेत उभा होता.
accident
accidentsakal media

कात्रज : पुणे बंगळुरू महामार्गावरील जांभूळवाडी दरीपुलावर गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

जांभूळ वाडी दरी पुलावर मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दिवसांपासून रेती वाहतूक करणारा एक ट्रक (एम एच १७ बी डी ७७६७) बंद अवस्थेत उभा होता. त्याला पाठीमागून गॅस वेल्डिंगच्या टाक्या वाहतूक करणाऱ्या पिकअपने (एमएच १४ ईएम ३६९६) जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

प्रदीप देवडकर असे जखमीचे नाव असून त्याला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृताचे नाव समजलेले नाही. अपघातामुळे एका बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com