Pimpri: विरकाचे अनधिकृत बांधकाम पाडले; पिंपरी-चिंचवड महापालिकेची धडक कारवाई

PCMC Demolishes Unauthorized Construction: फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नेलसिंह विरका याच्या संजयनगर येथील अनधिकृत बांधकामावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई केली.
Pimpri

Pimpri

esakal

Updated on

पिंपळे गुरव: फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील एक मुख्य आरोपी कर्नेलसिंह विरका याचे संजयनगरमधील अनधिकृत बांधकाम पिंपरी चिंचवड महापालिकेने गुरुवारी जमीनदोस्त केले. वरचा मजला आणि गच्चीवरील बांधकाम धडक कारवाईत पाडण्यात आले.अतिक्रमण निर्मूलन विभागाने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने ही कारवाई केली. विरकाला बुधवारी (ता. ३) नोटीस बजावण्यात आली होती. त्याने सुमारे ८७५ चौरस फूट जागेवर आलिशान घर बांधले होते. तो तळमजल्यावर राहायचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com