

पुणे : वैवाहिक संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे... तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करायचा... त्यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या एका काश्मिरी तरुणाला काळेपडळ पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली. या तरुणावर यापूर्वी दिल्ली, फरिदाबाद, भोपाळ आणि इंदूरमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.