

माळशिरस, ता. २१ : शासनाचे गौण खनिजाबाबत काहीही धोरण असले, तरी पोंढे (ता. माळशिरस) गावात खडी क्रशर होऊ न देण्याचा एकमुखी ठराव ग्रामस्थांनी केला आहे. वरिष्ठ स्तरावरून परवानगी मिळाल्यासही या निर्णयाविरोधात संघटितपणे लढण्याचा निर्धार ग्रामसभेत व्यक्त करण्यात आला.
गावातील गट क्रमांक ८६ मध्ये कैलास बबनराव इंगळे यांनी खडी क्रशर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याने ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासक तथा सरपंच मंदा लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. या सभेत यापूर्वी खडी क्रशरसाठी दिलेले सर्व ना-हरकत दाखले रद्द करण्यात आले. तसेच, इथून पुढे गावात कोणत्याही खडी क्रशरला परवानगी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
गौण खनिजाबाबत ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नसल्याचा शासन निर्णय असला, तरी ग्रामस्थांचा विरोध अंतिम राहील, असे ठरावात नमूद केले आहे. अशा प्रकल्पांसाठी गावातील सार्वजनिक रस्ते वापरू न देण्याचाही निर्णय झाला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार सुरू केला असून, आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत.
प्रशासकीय स्तरावर लढा
ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतरही खडी क्रशर सुरू करण्याचे प्रयत्न होत असल्याने गावकऱ्यांनी तालुका स्तरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धाव घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत गावात प्रदूषणकारी प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.