पुणे ः महात्मा जोतीराव फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त शनिवारी फुले वाड्याभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
Sakal
पुणे : फुले आणि विद्युत रोषणाईने आकर्षक सजलेला गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा, तर ‘समतेचा जागर’ करणारी क्रांतिगीते... अशा उत्साही वातावरणात शनिवारी (ता. ११) क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.