malegaon sugar factory
sakal
माळेगाव - सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 3900 ते चार हजार रुपये मिळत आहे, त्यामुळे रिकवरी झोन आणि माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याची सालाबाद प्रमाणे विक्रमी ऊस दराची परंपरा विचारात घेता या कारखान्याच्या प्रशासनाने आज 3900 रुपये पहिली उचल जाहीर केली. उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार व संचालक मंडळांनी वरील धोरणात्मक निर्णय घेतला, अशी माहिती उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी दिली.