मायणीत प्रशानाविरोधात व्यापाऱ्यांनी एल्गार

मायणीत प्रशानाविरोधात व्यापाऱ्यांनी एल्गार
Published on: 

मायणीतील व्यापाऱ्यांचे प्रशासनाला निवेदन
मायणी, ता. ८ : परिसरात वारंवार खंडित होणार वीजपुरवठा आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी दोन वाजलेपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून प्रशासनास निवेदन देऊ समस्या सोडविण्याची मागणी केली.
येथील चांदणी चौकातील श्री धनगर बिठोबा मंदिरात आज सकाळी ११ वाजता जमलेल्या व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी मायणी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्यासोबत आठवडा बाजारातील वाहतूक कोंडी, वडूज व दहिवडी रोडवरील हातगाडे, टपऱ्यांमुळे होत असलेली वाहतूक कोंडी आदी विषयावर चर्चा करण्यात आली. रणजित माने, उपसरपंच समीर नदाफ व ग्रामविकास अधिकारी शिवकुमार कोळी यांच्याशी व्यापाऱ्यांसाठी सुरू केलेल्या कचरा गाडी, रविवारी बसस्थानकावरील बसत असलेली विक्रेते, अतिक्रमण व वाहतूक कोंडी, स्ट्रीट लाइटबाबत चर्चा केली. गावात एकमेव राष्ट्रीयीकृत असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा द्याव्यात. करंट अकाउंट धारकांसाठी स्वतंत्र कॅश काउंटर सुरू करावे, ग्राहकांशी सभ्य वर्तणूक करावे, पेठेत एटीएममध्ये कायम कॅश उपलब्ध करून द्यावी, तसेच पासबुक प्रिंटिंग मशिन कायम चालू ठेवावी. विजेच्या कमी-जास्त दाबामुळे व्यवसायाचे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले, तर बसस्थानकाचे प्रमुखांना रविवारी बाजारदिवशी बस गावात येत नसल्याचे सांगितले.

03470
मायणी : येथील ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना व्यापारी. (अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com