पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात आज बैठक

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरू केली आहे.
Pune Municipal Corporation.
Pune Municipal Corporation.sakal
Summary

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरू केली आहे.

पुणे - सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) देखील तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) प्रभाग रचनेसंदर्भात (Ward Structure) आज मुंबईत बैठक (Meeting) बोलाविली आहे. यास हापालिकेचे दोन उपायुक्‍त उपस्थित राहणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी यास दुजोरा दिला.

ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि राज्य सरकारने निवडणुका घेण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार असे चित्र निर्माण झाले. दरम्यान पावसाळ्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका पुणे शक्य नाही त्यामुळे त्या सप्टेंबर मध्ये होतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये निवडणुका कधी होणार? हा प्रश्न अद्यापही कायम आहे.

महापालिकेने सहा डिसेंबरला प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. ही प्रभाग रचना नियमांना धरून झालेली नसल्याने निवडणूक आयोगाने २७ ठिकाणी बदल करून हा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर हरकती सूचनांनंतर ‘यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी त्यांच्या समितीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे यामध्ये मध्यवर्ती सह कोथरूड बाणेर बालेवाडी हडपसर यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात बदल सुचविले असल्याची चर्चा आहे. हा अहवाल दिल्यानंतरही अद्याप अंतिम प्रभाग रचना निश्चित झालेली नाही असे असताना मंगळवारी मुंबईत निवडणूक आयोगाने बैठक बोलावली आहे यामध्ये प्रभाग रचनेतील बदल प्रभाग रचना अंतिम करण्याच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com