जत : आईने १८ महिन्यांच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जत : आईने १८ महिन्यांच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Published on: 

दीड वर्षाच्या लेकीस पोटाशी
बांधून आईची आत्महत्या

जत तालुक्यातील प्रकार : कौटुंबिक वादातून विहिरीत उडी

सकाळ वृत्तसेवा
जत, माडग्याळ, ता. ६ : मायथळ (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर आईने दीड वर्षाच्या लेकीला पोटाशी ओढणीने बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नीता गजानन सोलनकर (वय २९) आणि अवनी गजानन सोलनकर (वय दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी (ता. ५) सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात या प्रकाराची नोंद झालेली नव्हती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत नीता यांचे माहेर वळसंग (ता. जत) आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी मायथळ येथील गजानन यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. गजानन ट्रकचालक म्हणून काम करत आहे. मृत नीता व त्यांच्या कुटुंबात अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. दरम्यान, म्हैसाळ योजनेचा पाणीपुरवठा सुरू असल्याने नीता सोलनकर यांच्या वस्तीपासून काही अंतरावर असलेली अवधूत सोलनकर यांची भरलेली विहीर आहे. आज सकाळी नीताने दीड वर्षाच्या अवनीला ओढणी पोटाशी बांधलेल्या अवस्थेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com