mpsc student agitation
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांवरून पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात इतर ठिकाणी राजकीय नेत्यांची रीघ लागली असताना, टिळक चौकात वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) पद्धतीच्या समर्थनार्थ बसलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे मात्र सर्वच राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आमच्या या रास्त आणि मूलभूत मागण्यांकडे नेते लक्ष कधी देणार?’’ असा उद्विग्न प्रश्न या आंदोलक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.