mpsc student agitation manoj jarange patil, raj thackery
sakal
पुणे - ‘परीक्षा पद्धतीतील गोंधळ, पेपरफुटी आणि वारंवार पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षांमुळे आम्ही अभ्यास करायचा की आंदोलन?’ असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांवर ठाम आहेत. पुण्यातील एस. एम. जोशी पूल, लालबहादूर शास्त्री रस्ता आणि टिळक चौक अशा तीन ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी (ता. ५) पाचवा दिवस होता. आंदोलनस्थळी दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान विविध राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.