National Recognition Granted to Umarda Cattle and Madgyal Sheep Breeds
sakal
पुणे - महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण उमरडा गोवंशाला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्यूरो, करनालच्या ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीच्या बैठकीत या दोन्ही प्रजातींच्या नोंदणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.