
पुणे : तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करता का, शिक्षणात नवनवीन प्रयोग करण्याची तुम्हाला आवड आहे का, या प्रश्नांची उत्तर 'होय' अशी असतील, तर इकडे लक्ष द्या. तुमचे हे काम, आवड देशाचे भविष्य घडविण्यासाठी हातभार लावू शकते. "ते कसे,' असं विचारत असाल तर ते शक्य आहे तुमच्याकडील विद्या दान केल्याने आणि ती करण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने "विद्यादान 2.0' या उपक्रमाद्वारे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना आता देशभरातील करोडो विद्यार्थ्यांचे उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य घडविण्याच्या कामात आपले योगदान देता येणार आहे. देशात ई-लर्निंगद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे, यासाठी हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम हाती घेतला आहे. तुम्हाला यात वैयक्तिकरीत्या किंवा शिक्षक, विषयतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ म्हणून सहभागी होता येणार आहे. तसेच शाळा, शिक्षण संस्था, सरकारी आणि खासगी संस्था म्हणून देखील योगदान देता येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी "https://vdn.diksha.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
एनजीटीला शासकीय कामांची 'लागण'; न्यायाधीश, तज्ज्ञांची निवड कोरोनामुळे...
अशा प्रकारे द्या योगदान
- अध्ययनातील संकल्पना समजावून सांगणाऱ्या ध्वनिचित्रफीत
- अभ्यासाच्या सरावासाठी प्रश्न
- प्रत्यक्ष शिकवतानाच्या ध्वनिचित्रफीत
- प्रयोगात्मक शिक्षणाचे व्हिडिओ
- अध्ययनातील धड्यानुसार शिकविण्याच्या वर्गाचे नियोजन
विद्यादानाचा उपक्रम स्तुत्य आहे; परंतु निकृष्ट दर्जाचे व्हिडिओ देखील याद्वारे अपलोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या उपक्रमाद्वारे येणाऱ्या विविध प्रकारच्या आशयाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. तरच दर्जेदार शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकेल.
- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.