बातमीचा भाग क्रमांक १ माजी आमदार पंडितराव देशमुख यांचे निधन शिक्षण, समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले; वसमत तालुक्यावर शोककळा

बातमीचा भाग क्रमांक १
माजी आमदार पंडितराव देशमुख यांचे निधन
शिक्षण, समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले; वसमत तालुक्यावर शोककळा
Published on: 

फोटोसह ws २२६B०१७५४
पंडितराव देशमुख
------------------
वसमतचे माजी आमदार
पंडितराव देशमुख यांचे निधन

वसमत (जि. हिंगोली) ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील हट्टा येथील रहिवासी, माजी आमदार, बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव पंडितराव देशमुख (वय ८७) यांचे नांदेड येथे उपचारादरम्यान गुरुवारी (ता. आठ) रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी (ता.नऊ) वसमत येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षक ते आमदारपदापर्यंत पोचलेल्या देशमुख यांनी शिक्षण, समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पंडितराव देशमुख यांनी शिक्षक म्हणून बहिर्जी प्राथमिक विद्यालय (वापटी) येथून कारकीर्दीस सुरवात केली. पुढे बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावल्यानंतर निवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या उमेदवारीवर जानेवारी १९७८ ते १९८० या कालावधीत त्यांनी विधिमंडळात वसमत विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. बहिर्जी शिक्षण संस्थेची उभारणी, वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. २००४ पासून ते बहिर्जी शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. पूर्णा कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यां त्यांच्या निधनाने हट्टा गावासह वसमत तालुक्यात शोक व्यक्त होत आहे.
----------

Marathi News Esakal
www.esakal.com