

Water released into the Pimpalgaon Joga left canal for irrigation in Junnar and Parner talukas.
esakal
राजेश कणसे
जुन्नर: चालु वर्षी पावसाने ओढ दिल्याने जुन्नर तालुक्यातील शेतीसमोर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पिंपळगाव जोगा धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने जुन्नर आणि पारनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणात सध्या सुमारे ८० टक्के पाणीसाठा असून, हे आवर्तन १ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा, ऊस, भाजीपाला तसेच चारा पिकांना पाण्याचा आधार मिळणार आहे.