

पुणे, ता. ५ : ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने विकसित केलेल्या मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमाची झिम्बाब्वे आणि कंबोडियाच्या शासकीय प्रतिनिधींनी पाहणी केली. हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नायगाव उपकेंद्राला त्यांनी भेट दिली.
या देशांमधील अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी आयोजित या दौऱ्यात प्रतिनिधींनी माता व बाल आरोग्य सेवा, औषधोपचार, नियमित तपासणी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम तसेच केंद्रातील आधुनिक सुविधांची माहिती घेतली. मॉड्यूलर शस्त्रक्रियागृह, अत्याधुनिक प्रसूतीगृह, डिजिटल आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांचीही त्यांनी पाहणी केली. नायगाव उपकेंद्रातील आरोग्य सेवांची प्राथमिक आरोग्य केंद्रापासून उपकेंद्रापर्यंतची सेवा साखळी अधिक सक्षम केल्याची माहिती घेतली. वाडेबोल्हाई येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते मैत्रीचे प्रतीक म्हणून वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य समितीच्या सभापती दीपाली हुलावळे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे, समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा खळदकर, मोनिका हरगुडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.