Chandrakant Patil
Chandrakant PatilSakal

एकटे नाही तर पॅनेल निवडून आणायचा विचार करा; चंद्रकांत पाटील

भाजपतर्फे ‘महापालिका २०२२’ ही दोन दिवसीय कार्यशाळा शहरात आयोजित केली होती.

पुणे - गेल्या साडेचार मेट्रो, पाणी पुरवठा यासह अनेक कामे झालेली आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीत ६६ हजार कार्यकर्ते आहेत. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील प्रत्येक कार्यकर्त्यास सोबत घेऊन काम करावे, संघटनेचा पूर्ण क्षमतेने वापर करा. महापालिकेत पुन्हा सत्ता येण्यासाठी एकटा निवडून येण्याऐवजी पूर्ण पॅनल निवडून आले पाहिजे असा विचार करून काम करा असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दिला.

भाजपतर्फे ‘महापालिका २०२२’ ही दोन दिवसीय कार्यशाळा शहरात आयोजित केली होती. आज (ता. १७) दुसऱ्या दिवशी कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन मंत्री रवी अनासपुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी यावेळी उपस्थित होते.

Chandrakant Patil
सलग तीन दिवसांच्या सुट्या मुळे सिंहगडावर झाली पर्यटकांची गर्दी

चंद्रकांत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष द्या असा आदेश देतानाच गेल्या साडे चार वर्षात आपण चांगल्या पद्धतीने काम केले आहे. शहरातील अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. या कामाच्या जोरावर आपण नागरिकांमध्ये गेले पाहिजे. तीनचा प्रभाग असला तरी यावेळीही १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊ शकतो, पण यासाठी आपण एकटे निवडून न येता पूर्ण पॅनल आले पाहिजे यादृष्टीने तयारी करा, पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही लक्ष आहे, असे पाटील यांनी बैठकीत सांगितल्याचे नगरेसवकांनी सांगितले.

खासदार बापट यांनी नगरसेवकांना जनसंपर्कावर भर देण्याचा सल्ला दिला. आपण प्रभागात फिरताना नागरिकांशी संवाद साधला पाहिजे. केवळ कारमधून न फिरता दुचाकी वापरा, चालत फिरता आले तर चांगलेच झाले. जेथे संपर्क कमी आहे, तेथे संपर्क वाढवा, नागरिकांच्या सुखदुःखात आपण सहभागी झाले पाहिजे, यादृष्टीने नगरसेवकांनी काम करावे, असे बापट यांनी बैठकीत सांगितले. महापौर मोहोळ यांनी भाजपची सत्ता आल्यानंतर कोणती कामे झाली याची माहिती दिली. सभागृहनेते बीडकर यांनी विरोधी पक्ष एकत्र आले तरी भाजपसाठी निवडणूक कशी सोपी आहे याची मांडणी केली.

‘महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. निवडणुकीत विजयी होण्यासाठीचे नियोजन कसे असले पाहिजे यावर चंद्रकांत पाटील, गिरीश बापट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.’

- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com