Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

GMRT Objections and Fund Withdrawal Raise Concerns Over Original Route: जुना पुणे-नाशिक रेल्वे मार्ग नारायणगाव येथील जीएमआरटीच्या परिसरातून जात आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे हायस्पीड वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या लहरींचा फटका जीएमआरटीला बसू शकतो.
pune nashik train

pune nashik train

esakal

Updated on

Chakan, Pune: गेली अनेक वर्षे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची चर्चा जोरात सुरू आहे. या मार्गात बदल होणार अशाही चर्चा रंगल्या आहेत. जुन्या मार्गाने रेल्वे मार्ग व्हावा यासाठी आंदोलने होत आहेत. परंतु पुणे-नाशिक सेमीहायस्पीड रेल्वे पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर,नारायणगाव , संगमनेर, सिन्नर ,नाशिक या मार्गाने होणार का? हाही सवाल निर्माण होत आहे. त्यात नारायणगावजवळील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com