देवींच्या दर्शनासाठी ‘पर्यटन बस’

देवींच्या दर्शनासाठी ‘पर्यटन बस’
Published on: 

पुणे, ता. ८ : नवरात्र उत्सवानिमित्त देवींच्या शक्तिस्थळांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) विशेष पर्यटन बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या बससेवेद्वारे शहरासह परिसरातील विविध देवींच्या मंदिरांना भेट देता येणार असून, भाविकांना किफायतशीर दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच इतर दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार या बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘पुणे दर्शन’ बससेवेच्या धर्तीवर वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बसमधून ही सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती महामंडळाने दिली.

पर्यटन बससेवा क्र. १३ (१)चा मार्ग पुणे स्टेशन, स्वारगेट, तळजाई माता मंदिर, पर्वती मंदिर, तुकाई माता मंदिर (कात्रज), श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी माता मंदिर आणि यमाई माता मंदिर असा आहे. ही बस पुणे स्टेशनहून सकाळी ८.३० वाजता सुटून सायंकाळी सात वाजता पुणे स्टेशनला परतणार आहे, तर पर्यटन बससेवा क्र. १३ (२)मध्ये महालक्ष्मी मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर, चतुश्रृंगी माता मंदिर, वैष्णवी माता मंदिर आणि भवानी माता मंदिराचा समावेश आहे. या बसचीही सुटण्याची वेळ सकाळी ८.३० असून, सायंकाळी सात वाजता ती पुणे स्टेशनला पोहोचेल.
दोन्ही सेवांसाठी प्रतिप्रवासी ५०० रुपये तिकीट आहे.

पर्यटन बससेवेचे आरक्षण डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे महापालिका भवन, भोसरी बसस्थानक आणि निगडी येथील पास केंद्रांवर करता येणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com