Pune Rain Red Alert: पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची रिपरिप; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड’ अलर्ट

सलग चौथ्या दिवशी रिपरिप पावसाने पुणे शहर व उपनगरांत गारवा, तापमानात घट; पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, घाटमाथ्यावर ‘रेड’ अलर्ट जाहीर
Heavy rainfall in Pune has led to waterlogging, traffic congestion, and a drop in temperatures across the city.

Heavy rainfall in Pune has led to waterlogging, traffic congestion, and a drop in temperatures across the city.

sakal
Updated on

पुणे : शहरात रविवारी (ता. ५) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रविवार सुट्टीचा दिवस असूनही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर पुढील दोन ते तीन दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून, पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर घाट परिसरासाठी ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com