

Election Duty Negligence: FIR Registered Against Teacher and Clerk in Pune
पुणे : मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी केंद्र शासनाकडून मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी एका शिक्षकासह लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १३४ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.