Raid on Illegal Scented Tobacco Manufacturing Unit in Loni Kalbhor Goods
sakal
पुणे - जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये कदमवाकवस्ती येथे शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर सुगंधित तंबाखू उत्पादन केंद्रावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि गुन्हे शाखेने संयुक्त छापा टाकला. रविवार (ता. २२) पहाटे झालेल्या या कारवाईत ११ लाख १५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.