

पुणे - महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे देशव्यापी जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व व प्रभाव वाढण्यास चालना मिळेल, अशी माहिती राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिली.