Pune News : अवघ्या दोनशे फूट अंतरात 'दुभाजकाचे' तीन जागी 'विभाजन'; दुभाजकामुळे अपघाताचा धोका

सिंहगड रस्त्यावर नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान अंदाजपत्रकामध्ये दुभाजकाचे काम प्रस्तावित होते.
road construction department road divider accident police pune
road construction department road divider accident police punesakal
Updated on

किरकटवाडी : अनेक दिवसांपासून रखडलेले सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यानचे दुभाजकाचे काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे मात्र सलग दुभाजक तयार न करता चाळीस ते पन्नास फूट अंतरावर जागोजागी विभाजन केल्याने या दुभाजकामुळे आणखी अपघातांचा धोका वाढला आहे.

त्यामुळे एखादे अत्यावश्यक ठिकाण वगळता दुभाजकाचे काम सलग करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

सिंहगड रस्त्यावर नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान अंदाजपत्रकामध्ये दुभाजकाचे काम प्रस्तावित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक दिवसांच्या विलंबाने रस्त्याचे काम करुन घेतले मात्र दुभाजकाचे काम अद्यापही प्रलंबित होते.

road construction department road divider accident police pune
Pune Girl Student Attack: पुण्यातील 'त्या' सुपरहिरोंना गृहमंत्री फडणवीसांचा फोन; लेशपाल अन् हर्षद म्हणाले...

दुभाजकासाठी रस्त्याच्या मधोमध सोडलेल्या धोकादायक फटीमुळे सातत्याने अपघात होत होते. याबाबत 'सकाळ'ने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे

मात्र आजुबाजुचे व्यावसायिक सांगतील त्या प्रमाणे दुभाजकाचे विभाजन करण्यात आल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दुभाजकाचे काम सलग करुन घेण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

road construction department road divider accident police pune
Pune : प्रथमच शोधले सुक्ष्म गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व; भारतीय शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण सहभाग

"अगोदरच या दुभाजकाची उंची अत्यंत कमी ठेवण्यात आली आहे आणि त्यातच जागोजागी वळण्यासाठी दुभाजक खंडीत करण्यात आलेला असल्याने अपघात कमी होण्यापेक्षा वाढणार आहेत. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे."

- उमेश बोरकर, नागरिक.

" सार्वजनिक बांधकाम विभागाडे या दुभाजकासाठी सातत्याने पाठपुरावा केला तेव्हा काम सुरू झाले आहे मात्र जागोजागी अनावश्यक क्रॉसिंग ठेवण्यात आले आहेत. अपघाताचा धोका असल्याने नियमानुसार व अंदाजपत्रकाप्रमाणे दुभाजकाचे काम होणे आवश्यक आहे."

- दत्तात्रेय कोल्हे, नागरिक.

"काम सुरू असताना आजुबाजुचे व्यावसायिक किंवा स्थानिक नागरिक वळण्यासाठी दुभाजक खंडीत करायला सांगतात मात्र संबंधित ठेकेदाराला सलग काम करण्यास सांगितले आहे. अपवाद वगळता इतर ठिकाणी सोडलेले दुभाजकाचे काम करुन घेण्यात येईल."

- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Excavation Chaos in Pune Leaves Newly Built ₹165 Crore Roads in Poor Condition
Encroachment Menace Grows in Vidyanagari, Residents Demand Immediate Action
Satara Sparks Debate: Clerk Faces Transfer, Not Disciplinary Action
मुळशी-मावळ सीमेवर मृत्यूचा सापळा! जवण घाटातील 'ती' विहीर ठरतेय धोकादायक; नाशिकच्या दुर्घटनेनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त
Marathi News Esakal
www.esakal.com