Pune News : प्रजासत्ताक दिन शिबिराचा १.७६ कोटींचा निधी रखडला; छात्रांचा ट्रॅकसूटवरच सराव

दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन शिबिर २०२७ साठी (आरडीसी) राज्यातील १२८ उत्कृष्ट एनसीसी छात्रांच्या तयारीला सरकारच्या अनास्थेचा फटका बसत आहे.
Fund

Fund

sakal 

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन शिबिर २०२७ साठी (आरडीसी) राज्यातील १२८ उत्कृष्ट एनसीसी छात्रांच्या तयारीला सरकारच्या अनास्थेचा फटका बसत आहे. या शिबिरासाठीचा सुमारे १.७६ कोटी रुपयांचा निधी अद्याप राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे रखडला आहे. त्यामुळे छात्रांना गणवेश, बूट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झालेले नाही. परिणामी, छात्रांना सध्या ट्रॅकसूटवरच सराव करावा लागत आहे. निधी वितरणातील या विलंबामुळे तयारीच्या नियोजनावर मर्यादा येत असल्याची खंत राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...