महत्त्वाची बातमी जिल्हा सहकारी बँक

महत्त्वाची बातमी जिल्हा सहकारी बँक
Published on: 

GHR26A09494
संगमनेर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना रणजितसिंह देशमुख.

जिल्हा बँकेसाठी देशमुख, सांगळे
यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
संगमनेर, ता. ५ ः अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता. ५) संगमनेर तालुक्यातून दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) मतदारसंघातून गणपत सांगळे, तर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून रणजितसिंह देशमुख यांनी अर्ज दाखल केला.
देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या (राजहंस) अध्यक्षपदाचा रीतसर राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राजहंस दूध संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
विविध मतदारसंघांतून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. दरम्यान, यापूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील अमृतकुटी येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीस माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com