

PNE26W49298 -
स्वतःच्या चुका व दोष शोधा; त्यात सुधारणा करा : साध्वी अक्षयश्रीजी म.सा.
सोलापूर : स्वतःला विशेष सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याऐवजी स्वतःच्या चुका व दोष शोधून त्यात सुधारणा करा, असा बोध परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांनी दिला. बलिदान चौक येथील जैन स्थानकात आयोजित अक्षय चातुर्मासात त्या बोलत होत्या. ‘‘उपयोगी बना, निरुपयोगी नको. कोणाच्यातरी कामाला या, सहकार्य करा. आयुष्य सार्थकी लावा,’’ असे आवाहन त्यांनी केले. अपमानास्पद बोलू नका, दुसऱ्याच्या चुका चारचौघांत सांगू नका. दोष सांगायचे असल्यास ते एकांतात सहजभावाने सांगा, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकून छोट्या जीवांचीही काळजी व रक्षण करा. सामाजिक कार्य करताना नाव-प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता परदर्शनाऐवजी स्वदर्शनाकडे लक्ष द्या. जिनशासन व तीर्थंकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. जीवदयेच्या मार्गात श्रमण-श्रमणींचे जीवन, औषधी हेतूरूपी रस व मौल्यवान धातूंचे प्रतीकात्मक महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.
--------------------
नश्वर देह व अविनाशी आत्म्याचा भेदच शिकवते अध्यात्म : मुनिश्री प्रशांतरत्न विजयजी
सोलापूर : देह नश्वर, तर आत्मा अविनाशी आहे. या दोघांमधील भेदाचे चिंतन केल्याशिवाय अध्यात्माची अनुभूती शक्य नाही. देहात आत्मा वास करत असला तरी दोघेही भिन्न आहेत. म्यान आणि तलवार एकत्र असल्या तरी त्यांचे अस्तित्व वेगळे असते. त्याप्रमाणे देह आणि आत्म्याचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. देह विनाशी आहे, या चिंतनातून देहाप्रतीचा मोह-ममत्व नष्ट होते, तर आत्मा अविनाशी आहे, या चिंतनातून आत्मज्ञान व आत्मध्यानाच्या साधनेची पीठिका तयार होते. आत्मचिंतनातून अध्यात्मसाधनेचा प्रारंभ होतो आणि आत्मानुभूतीत तिची पूर्णाहुती होते, असे मुनिश्री प्रशांतरत्न विजयजी यांनी सांगितले. आत्मज्ञान झाल्यानंतर अनंतकुमार चक्रवर्ती यांनी संसाराचा त्याग करून अध्यात्मसाधनेत लीन होत महामुनीपद प्राप्त केले व आत्मानुभूतीचा आनंद घेतला. त्यामुळे देहाच्या मोह-ममत्वाचा त्याग करून तत्त्वचिंतनातून आत्म्याचा खरा आनंद मिळवण्यासाठी पुरुषार्थ करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.