

MOD26A03204
अरण (ता. माढा) : शक्तिपीठ महामार्गाविरोधातील रास्ता रोको आंदोलनादरम्यान बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व उपस्थित शेतकरी (छायाचित्र : विरण कुलकर्णी, मोडनिंब)
‘शक्तिपीठ’साठी एक इंचही जमीन देऊ नका
राजू शेट्टी; महामार्गाविरोधात सोलापूर पुणे हायवेवर रास्ता रोको
मोडनिंब, ता. १७ ः प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांनी एक इंचही जमीन देऊ नये. सरकार आपली शेती उध्वस्त करणार आहे. शेतीच संपली तर आपण काय भीक मागणार का? सर्वेसाठी आलेल्या यंत्रणेला पळवून लावा. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले. शक्तिपीठ महामार्गा विरोधात सोलापूर पुणे महामार्गावर अरण (ता. माढा) येथे रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनादरम्यान ते बोलत होते.
माढा व माळशिरस तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सुमारे पाऊण तास हा महामार्ग रोखून धरला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शिवाजी पाटील, सचिन रणदिवे, सिद्धेश्वर घुगे, अजित बोरकर, जि. प. चे माजी सभापती संजय पाटील घाटणेकर, ॲड. विजय शिंदे आदी उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील देवस्थान जोडणार, शेतकऱ्यांना प्रचंड पैसे मिळणार या सरकारच्या भूलथापावर विश्वास ठेवू नका. चाळीस हजार कोटींचा हा महामार्ग सरकारने एक लाख कोटींवर नेला आहे. पुढील निवडणुकीची तजवीज म्हणून सरकारचा हा अट्टाहास आहे. या प्रस्तावित मार्गाला समांतर असा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग असताना शक्तिपीठचा आग्रह कशासाठी? कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही विरोध केल्याने हा महामार्ग तुमच्यावर लादला जात आहे.
चौकट
एजंटांच्या नादी लागू नका
प्रास्तावित महामार्गावर अनेक शेतकऱ्यांनी आंबा व इतर फळझाडांची लागवड केली आहे. यावर बोलताना शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी एजंटाच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले. सॅटेलाइट सर्वेमुळे नव्याने लागवड झालेल्या बागांचा काही उपयोग होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.