उंबरे पागेत चोरट्यांनी समर्थ ज्वेलर्स फोडले; १.१७ लाखांची चांदी लंपास

उंबरे पागेत चोरट्यांनी समर्थ ज्वेलर्स फोडले; १.१७ लाखांची चांदी लंपास
Published on

उंबरे पागेत ज्वेलर्स फोडले;
१.१७ लाखांची चांदी लंपास
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. २२ : उंबरे पागे (ता. पंढरपूर) येथील समर्थ ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने १ लाख १७ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले. १९ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातपासून २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला आहे.
याबाबत समर्थ ज्वेलर्सचे मालक ओंकार संतोष महामुनी (वय २४, रा. नेवरे, ता. माळशिरस) यांनी करकंब पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने दुकानातील १७ हजार ५०० रुपये किमतीच्या १७ चांदीच्या अंगठ्या (वजन ६८ ग्रॅम) आणि एक लाख रुपये किमतीची आठ चांदीची जोडवी (वजन ४०० ग्रॅम) असा एकूण १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी २० ऑगस्ट रोजी रात्री १०.१८ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नीलेश पोमणे करीत आहेत.
---
चोरट्यांपर्यंत लवकरच पोचू
चोरीच्या घटनेतील महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत असून, लवकरच चोरट्यांपर्यंत पोचू, असे सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com