सिंहगड घाट रस्त्यावरील दरड चार दिवसांपासून 'जैसे थे';वन विभागाने एक दगडही हलविला नाही; उद्यापासून गड सुरू होणार कसा?

सुदैवाने त्या दिवसापासूनच जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नव्हती
Sinhagad Ghat road landslide forest department did not take action  will fort start tomorrow
Sinhagad Ghat road landslide forest department did not take action will fort start tomorrowsakal
Updated on

सिंहगड : चार दिवसांपूर्वी सिंहगड घाट रस्त्यावर पडलेल्या दरडीचा ढीगारा अद्याप आहे तसाच असून वन विभागाने एक दगडही हलविलेला नाही. तसेच घाट रस्त्यावर अजून चार ते पाच ठीकाणी दरडी पडलेल्या आहेत तेही ढिगारे तसेच पडून आहेत. असे असताना वन विभागाने दरड हटविण्याचे काम नेमके कोठे सुरू केले होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. दि. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सिंहगड घाट रस्त्यावर गोळेवाडी तपासणी नाक्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पहिल्या मोठ्या वळणावर दरड कोसळली होती. सुदैवाने त्या दिवसापासूनच जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. त्यावेळी तातडीने सदर दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले होते.

हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांनीही दरड कोसळल्यानंतर संपूर्ण घाट रस्त्याची पाहणी केली होती व वन विभागाने दरड हटविण्याचे काम सुरू केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे या दोघांचाही दावा पोकळ आश्वासन ठरला असून आज चार दिवस झाले तरी सदर दरडीचा ढीगारा आहे तसाच पडून आहे. उद्यापासून सिंहगड पर्यटकांसाठी खुला होत असून दरड पडलेल्या ठिकाणी वाहनांना अडथळा निर्माण होणार आहे. तसेच दिशादर्शक फलकही अत्यंत धोकादायक स्थितीत रस्त्यावर आडवा पडलेला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.

"मी त्याच दिवशी प्रत्यक्ष पाहणी करुन वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. जेसीबी बोलविण्यात आला असून दरड ताबडतोब हटविण्यात येईल असे त्यांनी सांगितले होते. असे असताना अद्याप काम का झाले नाही त्याबाबत तात्काळ वन विभागाशी चर्चा करणार आहे. उद्यापासून गड पर्यटकांसाठी सुरू होत असल्याने हे काम होणे आवश्यक होते."

- निरंजन रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MNS opposed the Pune Municipal Corporation's proposal to lease prime Kothrud land without a public tender to a welfare foundation.
33 Gunthas, Thousands of Roses, and a Success Story Inspiring Maharashtra Farmers
Krushiratna Anil Meher received the Yash Jeevan Gaurav Award 2026 for excellence in agriculture, rural development, and farmer empowerment.
Pune Crime: Ten Booked After Brutal Assault on Woman and Her Family in Khadki
Marathi News Esakal
www.esakal.com