सिंहगड रस्त्यावर उपाययोजना कराव्यात

सिंहगड रस्त्यावर 
उपाययोजना कराव्यात
Published on: 

सिंहगड रस्ता, ता. २३ : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नव्या घोषणा करण्याऐवजी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्वच्छ व सुंदर धायरी कृती समितीने केली आहे. वाहतूक सर्वेक्षणाचा अहवाल, प्रलंबित पूल व विकास आराखड्यातील रस्त्यांच्या कामांची प्रगती आणि उर्वरित कामांचे कालबद्ध वेळापत्रक सार्वजनिक करावे, असे समितीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
खोदकामामुळे शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्त्यावर नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर समितीने कामांचे पूर्वनियोजन आणि संबंधित विभागांतील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित केले. याबाबत समितीचे संस्थापक-मुख्य समन्वयक विनीत धारणकर आणि समन्वयक जयश्री देशपांडे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की उड्डाणपूल सुरू होऊनही त्यावर आणि खालील मार्गांवर कोंडी होत आहे. अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावर येणाऱ्या विक्रेत्यांच्या व्यवसायांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत असल्याचे समितीने नमूद केले.

या आहेत मागण्या
- सिंहगड रस्त्याचा वाहतूक सर्वेक्षण अहवाल जाहीर करावा
- सनसिटी-कर्वेनगर पुलाच्या दोन्ही बाजूंचे जोडरस्ते पूर्ण करावेत
- राजाराम पुलाच्या प्रस्तावित रुंदीकरणासाठी निधी द्यावा
- धायरीसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com