‘सीसीटीव्ही’ला बोळा लावून साडेतीन लाखांची चोरी

‘सीसीटीव्ही’ला बोळा लावून साडेतीन लाखांची चोरी
Published on: 

‘सीसीटीव्ही’ला बोळा लावून साडेतीन लाखांची चोरी

चोरटा बेडशीट पांघरून पसार; दांपत्य गेले होते मुलीकडे पुण्याला
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : विजापूर रोडवरील शिवाजी महारुद्दप्पा शेटे (वय ६५) यांच्या घरातून चोरट्याने तीन लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बंद घरात शिरलेल्या चोरट्याने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापडाचा बोळा लावला आणि रोकड, दागिने घेऊन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी शिवाजी शेटे यांच्या मुलीचे नवीन लग्न झाले आहे. त्यामुळे शिवाजी शेटे आपल्या पत्नीसोबत मुलीकडे खराडी (पुणे) येथे गेले होते. मुलीकडे गेल्यावर ते एक दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी परतले. या दरम्यान २ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते ४ ऑक्टोबरच्या सकाळी सव्वासहापर्यंत त्यांच्या घरात चोरी झाल्याची फिर्याद त्यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. फिर्यादी पुण्यावरून परतल्यानंतर त्यांच्या घराच्या पोर्चमधील लोखंडी गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात गेल्यावर कपाट उचकटलेले होते. घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड, असा एकूण तीन लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी केली. त्यावेळी घरात सीसीटीव्ही कॅमेरा होता, पण चोरट्याने चोरी करण्यापूर्वी तो झाकल्याचे दिसून आले. तत्पूर्वी, घराच्या कंपाउंडवरून उडी मारून एक चोरटा आत आला. त्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बाहेर जाताना चोरट्याने अंगावर बेडशीट पांघरल्याचेही बाहेरील सीसीटीव्हीत दिसून आले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com