सुनील नगरात आग

सुनील नगरात आग
Published on

ज्यूटच्या गोण्या अन् कापसाच्या कचऱ्याने घेतला पेट
एस.पी. एंटरप्रायझेसला आग; सहा बंबांच्या मदतीने नियंत्रण

सोलापूर, ता. २४ : सुनील नगरजवळील गणेशनगर परिसरातील अरुण स्कूलजवळ असलेल्या एस.पी. एंटरप्रायझेसला रविवारी अचानक आग लागली. ज्यूटच्या गोण्या अन् कापसाचा कचरा असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. सहा अग्निशमन बंबांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेत ज्यूटच्या गोण्या, कापसाचा कचरा, यंत्रसामग्री अन् अन्य साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. आग पूर्ण आटोक्यात आल्यानंतर पंचनामा झाल्यानंतर किती नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळणार आहे.

आगीची माहिती मिळताच महापौर विनायक कोंड्याल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्याकडून त्यांनी आगीची स्थिती अन् बचावकार्याची माहिती घेतली. आग पूर्णपणे विझविण्यासाठी आवश्यक यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी खासगी पाण्याच्या टँकरचीही मदत घेण्यात आली.
एस.पी. एंटरप्रायझेसचे मालक पिरजादे यांच्या आस्थापनातील ज्यूटच्या गोण्या अन् कापसाच्या कचऱ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धुराच्या लोटांमध्ये शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

सुदैवाने जीवितहानी नाही
या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कमही अद्याप निश्चित झालेली नाही. आग पूर्णपणे विझल्यानंतर संबंधित विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com