साखर कारखान्यांचा गाळप हंगाम

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम
Published on: 

विनापरवाना गाळप केल्यास
कारखान्यांवर थेट कारवाई

सहसंचालक किरण गायकवाड यांचा : ४९ अर्जापैकी ४५ अर्जात त्रुटी
----
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी सुरू करू शकतात. हंगाम सुरू करण्यापूर्वी त्या कारखान्याला गाळप परवाना आवश्‍यकच आहे. विना परवाना गाळप करणाऱ्या कारखान्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापुरचे साखर सहसंचालक किरण गायकवाड यांनी दिला आहे. या वर्षी ऊसाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभुमीवर काही कारखाने विना परवाना गाळप करण्याची शक्यता असल्याने, साखर सहसंचालक कार्यालय बारकाईने लक्ष ठेवून आहे.
ज्या कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी आवश्यक ते सर्व कायदेशीर व प्रशासकीय निकष पूर्ण केले आहेत ते कारखाने १५ ऑक्टोबरपासून किंवा त्यापूर्वी आपला गाळप हंगाम सुरू करू शकतात. गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची कोणतीही सक्ती नाही, १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप करण्यासाठी अर्ज करणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येईल, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. ही भूमिका घेताना कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्त कार्यालयाकडून आवश्यक तो अधिकृत गाळप परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारकही करण्यात आले आहे.
सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातील ४९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी सोलापुरच्या साखर सहसंचालक कार्यालयाकडे अर्ज केला आहे. यातील तब्बल ४५ कारखान्यांच्या अर्जात काही न काही त्रुटी असल्याने त्या कारखान्यांना त्रुटी पुर्ततेबाबत कळविण्यात आले आहे. ज्या चार साखर कारखान्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर केले आहेत. त्या कारखान्यांचे प्रस्ताव सहसंचालक कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
-----
कोट
PNE26W55301
साखर कारखान्यांनी वेळेत व तत्काळ गाळप परवान्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. गाळप परवाना नसताना साखर कारखाना सुरू केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. परवान्याशिवाय कोणते कारखाने सुरू झाले याबाबत कार्यालयाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
- किरण गायकवाड, सहसंचालक, साखर, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com