उस उत्पादक बातमी

उस उत्पादक बातमी
Published on: 

PNE26W56260
पुणे ः साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशी ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर चर्चा करताना शिवसेना नेते अभिजित पोटे, प्रा. जालिंदर पाटील, रवींद्र मोरे, राजेंद्र लोंढे आदी.

ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर मंत्रालयात बैठक
सहकारमंत्री करणार शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा
अहिल्यानगर, ता.८ ः सन २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील मंत्रालयात सहकार मंत्र्यांसोबत शिवसेनेचे नेते अभिजित पोटे यांच्यासह १० शेतकरी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने याबाबत पत्राद्वारे माहिती दिली आहे. शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलनापासून परावृत्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर पोटे यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, उपप्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र लोंढे, जयंत पवार, वसंत कदम, बाळासाहेब कदम, संजय वाघ, गणेश सातपुते आदी उपस्थित होते.
दरम्यान, कमी पर्जन्यमानामुळे यंदा ऊस पिकाची अपेक्षित वाढ झालेली नसल्याचे सांगत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रति टन ५ हजार रुपये ऊस दर द्यावा अथवा प्रति टन १ हजार रुपये अनुदान जाहीर करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. साखर कारखान्यांच्या डिजिटल वजन काट्यांमध्ये होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी आयटी इंजिनिअरचा समावेश असलेले भरारी पथक नियुक्त करावे. उसाचे वजन झाल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे वजनाची माहिती पाठवणे बंधनकारक करावे. सन २०२५-२६ च्या गाळप हंगामात साखर व उपपदार्थांना मिळालेल्या दराचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ५२५ रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com