koyta gang terror
sakal
लोणी काळभोर - हातात लोखंडी कोयता फिरवत नागरिकांना शिवीगाळ आणि धमकावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लोणी काळभोर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील संभाजीनगर परिसरात १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता आणि होंडा शाईन दुचाकी असा एकूण ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.