Pune Crime : हॉटेलमध्ये जास्त वेळ बसल्याने पुण्यात ग्राहकाला दांडक्याने मारहाण, डोक्यात फोडली बाटली; तिघांना अटक

A customer was beaten with a stick in Pune for sitting in a hotel for too long...
Crime
Crimeesakal
Published on

पुणे : हॉटेलमध्ये जास्त वेळ बसल्यावरून ग्राहकाला मारहाण केल्याची घटना कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील सृष्टी हॉटेलमध्ये सोमवारी घडली. या प्रकरणी हॉटेलमधील तीन कामगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सागर पांडुरंग मरगळे (वय २४, रा. नऱ्हे) यांनी पोलिस फिर्याद दिली. त्यावरून कामगार धनंजय संजय भोसले (वय ३२), रफिक राजू अहमद (वय १९) आणि विशाल रमेश गुप्ता (वय २०, सर्व रा. सृष्टी हॉटेल, मांगडेवाडी, कात्रज) यांना अटक केली.

फिर्यादी सागर आणि त्यांचा मावसभाऊ मधू माने यांनी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर सागर हे भाऊ बाळू आणि कृष्णा यांची वाट पाहत होते. त्यावर आरोपींनी त्यांना जास्त वेळ का बसलात, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. एका कामगाराने मधूला लाकडी दांडक्याने मारल्याने त्याच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. एकाने सागर यांच्या डोक्यात बाटली फोडली. त्यावेळी फिर्यादीला वाचवण्यासाठी आलेल्या भावांनाही आरोपींनी मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com