सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Published on

आळंदी, ता. १: दहावी इयत्तेतील साडेसतरा वर्षांच्या पीडित मुलीवर तिच्या सावत्र वडिलांनी अत्याचार केले. तर आईने कामाला जात नाही म्हणून मारहाण शिवीगाळ केली. याप्रकरणी आई आणि सावत्र वडिलांवर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना चिंबळी येथे २०२५ मध्ये जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान वारंवार घडली. याप्रकरणी संबंधित साडेसतरा वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई आणि सावत्र वडील हे खेड तालुका वगळता अन्य तालुक्यामधील आहे. दरम्यान, याबाबतचा प्रथम गुन्हा शिक्रापूर पोलिस ठाणे शून्य नंबरने दाखल करून तो आळंदी पोलिस ठाणामध्ये वर्ग करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com