

आळंदी, ता. ३ : आळंदी आणि परिसरात आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून असलेल्या उकाड्यानंतर अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली; शेतीकामांचेही नुकसान झाले.
दुपारी अचानक आकाश ढगाळून आले आणि पावसाला सुरुवात झाली. यामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. पावसामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांनी आडोशाचा आधार घेतला. शेतात गहू, ज्वारी काढणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांची पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ झाली. वैरण वाचवण्यासाठीही शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. पावसासोबतच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सायंकाळी साडेचारनंतर पावसाचा जोर ओसरला असला, तरी ढगांचा गडगडाट कायम असल्याने पावसाची शक्यता कायम होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.