

आळेफाटा, ता. ७ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील श्रीसंत सावता महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरावरील भजन स्पर्धेत आलमे येथील ओम भूमेश्वर प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेची सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून झाली.
प्रथम क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. द्वितीयसाठी ११ हजार १११ रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ९ हजार ९९९ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. चतुर्थसाठी ७ हजार ७७७ रुपये तर पाचव्या क्रमांकासाठी ५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट होर्मोनियम, तबला वादक व उत्कृष्ट गायक, गायिका, उत्तेजनार्थ भजन संघासाठी प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. शिस्तबद्ध संघास आणि लांबून येणाऱ्या संघास प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातून २७ भजन मंडळे सहभागी झाली होती.
सर्व विजेत्यांना आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गणेश वाघमारे, उपाध्यक्ष सुरेश गडगे, सचिव सुरेश गडगे, अरविंद शिंदे, खजिनदार अशोक गडगे, विश्वस्त गणपत गडगे, शिवाजी शिंदे, प्रताप शिंदे, महेंद्र भुजबळ, गोपाळ फुलसुंदर, सोमनाथ गडगे, सचिन गडगे यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. स्पर्धेदरम्यान माजी पंचायत समिती नेताजी डोके, अनंतराव चौगुले, दिलीप कोल्हे, मोहन पाटील भुजबळ, उपसरपंच ऋषिकेश गडगे, सोसायटी उपाध्यक्ष प्रमोद गडगे, सचिन वाळुंज, प्रदीप देवकर उपस्थित होते. स्पर्धेसाठी उद्योजक जालिंदर गागरे, विलास गडगे, गणपत गडगे, दगडू भुजबळ, दत्तानाना गडगे, बाळू शिंदे, अर्चना वाघमारे, सुरेश चौगुले, विकास शिंदे, अभिमन्यू गडगे, गणेश वाळुंज, संदीप गडगे, गणेश देवकर, रवींद्र भुजबळ यांनी बक्षीस सौजन्य दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.