आंबेगाव तालुक्यातील गावचा कारभार ठप्प

आंबेगाव तालुक्यातील गावचा कारभार ठप्प
Published on

पारगाव, ता. २८ : आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीचे ६८ संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने दहा दिवसापासून तालुक्यातील विविध गावचा कारभार ठप्प झाला आहे. असे आंबेगाव संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्षा सुशीला काळे व सचिव संदीप आळेकर यांनी सांगितले.

या आंदोलनाबाबत माहिती देताना सचिव आळेकर म्हणाले, शासनाच्या नेहमीच्या आश्वासनाला संगणक परिचालक वैतागले असून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीचे संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे. संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिक काम करत असताना शासनाने ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतिबंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत मासिक वीस हजार मानधन देणे या प्रमुख मागण्यांकडे अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासन देऊन सुद्धा दुर्लक्ष केले आहे.

सुधारित आकृतीबंधाची फाइल जागेवरच असून अनेक जिल्हा परिषदेकडून अभिप्राय दिलेला नसल्याने हा शासनाचा व प्रशासनाचा वेळ काढूपणा असल्याची संगणक परिचालकांची भावना झाली असून, एकीकडे कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यायचे नाही व दुसरीकडे महागाईच्या काळात केवळ सहा हजार नऊशे तीस रुपये मासिक मानधनावर काम करावे लागत आहे. हे मानधन देखील केव्हाच वेळेवर मिळत नाही. ग्राम स्तरावर काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी आशा वर्कर, अंगणवाडी ताई, पोलिस पाटील कोतवाल यांच्या मानधनात वाढ झाली. मात्र संगणक परिचालक मात्र दुर्लक्षित आहेत. टार्गेट सिस्टीम लागू करून संगणक परिचालकांना कंपनीकडून मानसिक त्रास देणे सुरू असल्याची आळेकर यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील सर्व संगणक परिचालक या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष शाहरुख पटेल यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com