अजितदादा पवार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रथमेश काळे

अजितदादा पवार पतसंस्थेच्या 
अध्यक्षपदी प्रथमेश काळे
Published on

आपटाळे, ता. १० ः जुन्नर येथील अजितदादा पवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रथमेश संजयराव काळे, उपाध्यक्षपदी प्रकाश नानाभाऊ ताजणे, तर सचिवपदी सुभाष शंकरराव कवडे यांची बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजयराव काळे यांच्या नेतृत्वाखाली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांनी कामकाज पाहिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

पतसंस्थेचे नवनियुक्त संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष - प्रथमेश संजयराव काळे, उपाध्यक्ष - प्रकाश नानाभाऊ ताजणे, सचिव - सुभाष शंकरराव कवडे, सहसचिव - बाळासाहेब शंकर मस्करे, खजिनदार - उल्हास चिमाजी तांबे, संचालक- सारंग कैलास घोलप, संदेश कारभारी बोंबले, सुरेश तुकाराम महाबरे, विठ्ठल ढवळा केदार, सचिन अनिल वर्धेकर, कुसुम विकास दुराफे, रश्मी शरद घोंगडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com