कोर्ले- जांभूळवाडी- रायरेश्वर रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणार

कोर्ले- जांभूळवाडी- रायरेश्वर 
रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणार
Published on

भोर, ता. २६ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर भोर तालुक्याच्या बाजूकडून जाणाऱ्या मार्गाच्या कॉंक्रीटीकरणासाठी ६ कोटी ३८ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.
सद्यःस्थितीत रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी भोर तालुक्यातील कोर्ले गावानंतर वाई (जि. सातारा) तालुक्यातील केंजळगड- व्याहाळी मार्गे जावे लागत आहे. कोर्ले गावाहून रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी सध्या ९ किलोमीटर अंतर आहे. कोर्ले गावाहून जांभूळवाडी मार्गे रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी ३ किलोमीटरचा एक कच्चा रस्ता आहे. मात्र, रस्ता सुस्थितीत आणि धोकादायक असल्यामुळे तो वापरात येत नाही. यासाठी भोर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी समीर घोडेकर यांनी साताऱ्याचे माजी नगरसेवक सुनील काळेकर व शिवभक्त राहुल कोपरकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा येथे भेट घेऊन कोर्ले-जांभूळवाडी-रायरेश्वर या रस्त्याची दुरुस्ती व कॉंक्रीटीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिवेंद्रराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अंदाजपत्रक करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मागील आठवड्यात भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ६ कोटी ३८ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासोबत गटारे, साईडपट्टया आणि आवश्यक त्या ठिकाणी वळणे व रस्ता दुरुस्ती करण्यात येणार आहे. कोर्ले- जांभूळवाडी मार्गे मार्गाचे काम पूर्ण झाल्यास रायरेश्वरावर जाण्यासाठीचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार असून, पर्यटकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com