

चास, ता. २ : चास (ता. खेड) येथील मस्जिद परिसरातील नारळाच्या झाडावर गुरुवारी (ता. २) सायंकाळी वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र जिल्हा परिषदेने बसवलेली विजरोधक यंत्रणा पुन्हा एकदा कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चास व परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी गावातील मस्जिदमध्ये असलेल्या नारळाच्या झाडावर अचानक वीज कोसळली. विशेष म्हणजे, वीज कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने काही वर्षांपूर्वी येथे विजरोधक यंत्रणा बसवली होती. मात्र, ही यंत्रणा कार्यान्वित असूनही वीज पडण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. यापूर्वी याच परिसरात राम काळे यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. आता पुन्हा ही घटना घडल्याने या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
04461
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.